भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – भुसावळ तालुक्यातील पिंपळगाव खुर्द येथे शासनाच्याच्या वतीने पिण्याच्या पाईपलाईनचे काम सुरू असून ते नित्कृष्ठ दर्जाचे असल्याने चौकशी करावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य विष्णू राणे यांनी बी डीओ यांच्या कडे केली आहे .निवेदनात म्हटले आहे की पिंपळगाव खुर्द येथे नवीन पाईपलाईनचे काम चालू असून पूर्ण गावातील रस्ते जेसीबीच्या साह्याने खोदून ठेवलेले आहे.सदर चालू असलेले काम हे गावातील विविध ठिकाणी खोदकाम करून अपूर्ण ठेवत असून त्या ठिकाणी नागरिकांची रोज ये जा होत असते.गावातील शाळकरी मुले मुली , महिला ,जेष्ठ नागरिक,वयोवृद्ध नागरिकांना या गोष्टी सामोरे जावे लागत आहे.विविध ठिकाणी अनेक प्रकारच्या अपघात सुद्धा होत आहे.
सदरचे काम नित्कृष्ट दर्जाचे असून ग्रामपंचायत सदस्य व गावातील नागरिक यांनी ठेकेदार पूर्ण कामा बद्दल माहीतो मागितली असता ते उडवा उडवी चे उत्तरे देत आहेत.गावांमध्ये पाण्याचा तुटवडा असून नागरिक संताप व्यक्त करत आहे.सदर कनेक्शन करता ठेकेदार पैशांची सुद्धा मागणी करत आहे.तरी या कामाविषयी त्वरित चौकशी व्हावी असे निवेदनात नमूद केले आहे