Sunday, April 27, 2025
Homeगुन्हापिकअप व्हॅन व दुचाकीची समोरासमोर धडक ; दुचाकीस्वार जागीच ठार !

पिकअप व्हॅन व दुचाकीची समोरासमोर धडक ; दुचाकीस्वार जागीच ठार !

पिकअप व्हॅन व दुचाकीची समोरासमोर धडक ; दुचाकीस्वार जागीच ठार !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा गावाच्या विठ्ठल मंदिराजवळ पिकअप व्हॅन आणि दुचाकी यांची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ११ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सडावण येथील हर्षल अशोक पाटील (वय २८) हा त्याची दुचाकी (एमएच – १९, इएल- ४८१८) ने जात असताना समोरून येणाऱ्या पिकअप व्हॅन (एमएच १८, बीजी-८४०) ने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ११ रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास टाकरखेडा येथील विठ्ठल मंदिराजवळ घडली. या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ मनोज प्रकाश पाटील याने अमळनेर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पिकअप व्हॅन चालकविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास हेडकॉन्स्टेबल सुनील जाधव करत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या