Monday, March 24, 2025
Homeगुन्हापिता-पुत्राला चाकूने वार ; तीन अटकेत

पिता-पुत्राला चाकूने वार ; तीन अटकेत

पिता-पुत्राला चाकूने वार ; तीन अटकेत

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – माझ्या मुलापासून दूर राहा, त्याला तुमच्यामुळे व्यसन लागेल, असे बोलल्याचा राग आल्याने दोघा भावांनी पिता-पुत्राला चाकूने मारहाण करून जखमी केले. ही घटना कापूसवाडी (ता. जामनेर) येथे घडली. याबाबत तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,गजानन आनंदा थोरात (४६, रा. कापूसवाडी, ता. जामनेर) हे घराच्या बांधकामावर पाणी मारीत असताना पूर्वीच्या वादावरून सागर सोनवणे याने गजानन सोनवणे यांच्यावर चाकूने वार केले. त्यांना सोडविण्यासाठी गेलेला मुलगा सौरभ यांच्यावरही गजानन सोनवणे याने सागर याच्या हातातील चाकू घेऊन वार करून जखमी केले. नातेवाईक व नागरिकांनी धाव घेताच दोघे पळून गेले. नागरिकांनी जखमी अवस्थेत दोघांना जामनेर येथे उपचारासाठी आणले.

प्राथमिक उपचारानंतर त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले. गजानन थोरात यांच्या तक्रारीवरून फत्तेपूर पोलिसांनी तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या