Sunday, March 16, 2025
Homeगुन्हापीएफ ऑडिट रिपोर्ट देण्याच्या मोबदल्यात घेतली २५ हजारांची लाच !

पीएफ ऑडिट रिपोर्ट देण्याच्या मोबदल्यात घेतली २५ हजारांची लाच !

पीएफ ऑडिट रिपोर्ट देण्याच्या मोबदल्यात घेतली २५ हजारांची लाच !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पीएफ ऑडिट रिपोर्ट देण्याच्या मोबदल्यात २५ हजारांची लाच घेणाऱ्या एमआयडीसीतील पीएफ कार्यालयातील मुख्य वित्त व लेखाधिकाऱ्याला पुण्यातील सीबीआय पथकाने मंगळवारी सापळा रचून रंगेहाथ पकडले आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, बुधवारी जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ११ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.रमण वामन पवार (वय-५८, रा. बळीराम पेठ, जळगाव) असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. शनिपेठ भागातील सचिन माळी यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या कामगार पुरवठा करणाऱ्या फर्मचे लेखापरीक्षण करण्याबाबत पीएफ कार्यालयाकडून माळी यांना नोटीस बजावली होती. लेखापरीक्षण अहवाल देण्याबाबत लाचेची मागणी करण्यात आली होती.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या