पूर्णाड फाट्यावर तब्बल अडीच कोटी रुपयांचा गुटखा जप्त!
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!
मुक्ताईनगर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मुक्ताईनगर तालुक्यातील पूर्णाड फाटा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई करत २ ते अडीच कोटी रुपयांचा गुटखा पकडला आहे. या कारवाईत वाहनासह कोट्यावधी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की,मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णाड फाटाजवळ अवैधरित्या परराज्यातून गुटख्याची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मुक्ताईनगर पोलिसांना मिळाली त्यानुसार पथकाने रात्री कारवाई करत पोलिसांची दीड ते अडीच कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन कारवाई केली आहे.यावेळी पोलिसांनी जप्त केलेल्या ट्रक मधून सुमारे दोन ते अडीच कोटी रुपयांचा गुटखा हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.