Sunday, April 27, 2025
Homeगुन्हापैसे घेतलेले परत कर म्हणत महिलेला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण ; गुन्हा दाखल!

पैसे घेतलेले परत कर म्हणत महिलेला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण ; गुन्हा दाखल!

पैसे घेतलेले परत कर म्हणत महिलेला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण ; गुन्हा दाखल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तुझ्या मुलाने जावायाकडून पैसे घेतलेले आहे, ते पैसे परत कर या कारणावरुन मिराबाई हंसराज राठोड (वय ५०, रा. रामदेववाडी, ता. जळगाव) या महिलेला लाथाबुक्क्यांनी माराहण करीत तिच्या डोक्यात लोखंडी सळई टाकून गंभीर जखमी केले. ही घटना दि. १६ गी रात्री ८ वाजेच्या सुमारास रामदेववाडी परिसरात घडली. याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील रामदेववाडी येथे मिराबाई हंसराज राठोड या महिला वास्तव्यास असून त्या शेतीकाम करतात. दि. १६ रोजी रात्रीच्या सुमारास त्यांच्या गावातीलल रामलाल कोल्हा राठोड हा त्यांच्याघराजवळ आला. त्याने मिराबाई राठोड यांना म्हणाला की, तुझ्या मुलाने माझ्या जावाईकडून पैसे घेतले आहे, ते पैसे परत कर या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. यावेळी रामलाल राठोड याने त्याच्या हातातील लोखंडी सळई मिराबाई यांच्या डोक्यात टाकली तर बबन रामलाल राठोड याने देखील त्यांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करीत गंभीर जखमी केले. दरम्यान, महिलेने तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार रामलाल कोल्हा राठोड व त्यांचा मुलगा बबन रामलाल राठोड दोघ रा. रामदेववाडी, ता. जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ स्वप्निल पाटील हे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या