Wednesday, March 26, 2025
Homeजळगावपोलिस,होमगार्ड यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील स्री -पुरुष, सदस्यांचा आपुलकीचा तगडा...

पोलिस,होमगार्ड यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील स्री -पुरुष, सदस्यांचा आपुलकीचा तगडा बंदोबस्त.

पोलिस,होमगार्ड यांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील स्री -पुरुष, सदस्यांचा आपुलकीचा तगडा बंदोबस्त.

जातीय सलोख्याची उत्तम कौतुकास्पद प्रथा प्रथमच सुरू केली यावल पोलिसांनी.

यावल दि.१८ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  यावल पोलीस स्टेशन आवारात पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहकार्याने यावल पोलीस आणि यावल होमगार्ड पथकाने श्री गणेशाची स्थापना केली होती, यावल शहरात ५ व्या दिवशी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीत यावल पोलिसांनी यशस्वीपणे बंदोबस्त ठेवला होता.

 


शासकीय कामकाज कर्तव्य आटोपल्यानंतर यावल पोलीस व होमगार्ड पथकाने स्थापन केलेल्या गणपती बाप्पाची आज बुधवार दि.१८ रोजी सकाळी ११ वाजता गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात शांततेत यावल पोलीस कार्यालयाच्या आवारातून यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पोलिसांनी व होमगार्ड पथकांने काढली यात मात्र यावल शहरातील सर्व स्तरातील,सर्व जाती धर्मातील नागरिक स्री – पुरुषांनी,शांतता कमिटी सदस्यांनी पोलिसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन नागरिक, समाजसेवक म्हणून मोठ्या संख्येने उपस्थिती देऊन तगडा बंदोबस्त ठेवला ही विसर्जन मिरवणूक पोलिसांची मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडली.या मिरवणुकीत सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या भावनांचा आदर ठेवीत गुलाल न उधळता फुलांची उधळण करण्यात आली या विसर्जन मिरवणुकीत मात्र पोलिसांची भूमिका नागरिक सदस्यांनी स्वतःहून स्विकारत पोलिसांच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत नागरिक म्हणून उपस्थिती देऊन तगडा बंदोबस्त ठेवला,यात पोलिसांचा मोठा उत्साह,जातीय सलोखा दिसून आला.पोलिसांचा गणेशोत्सव गणेश विसर्जन मिरवणूक नवीन प्रथा पांयडा म्हणून सर्वत्र कौतुकास्पद ठरला असला तरी यावल शहरातून दरवर्षी किमान एक गणेशोत्सव किंवा एक दुर्गोत्सव मंडळ सर्व जाती धर्मातील नागरिकांच्या सहभागाने स्थापन करून आपण स्वतः नागरिक म्हणून तगडा बंदोबस्त राखीत ( पोलिसांचा बंदोबस्त न घेता ) उत्सव शांततेत मोठ्या उत्साहात साजरे करून शासनाला समाजाला जातीय सलोखा कसा राखावा.हे आपल्या समाजाला, जनतेला, राजकारणाला, दाखवून द्यायला पाहिजे असे सुद्धा आता यावल शहरात बोलले जात आहे.

 


फक्त काही वेळेला यावल पोलिसांचे कौतुक करणारे काही जण,आणि संधी साधणारे, चमकोगिरी करणारे,आपला वैयक्तिक हेतू साध्य करणारे,दोन नंबरचे काही धंदे करणारे,दलाली करणारे,जातीय सलोख्याला न मानणारे काही दोन-चार विघ्न संतोषी मात्र पोलिसांच्या या गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी न झाल्याने संपूर्ण यावल शहरात चर्चा सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या