Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हापोलिसांचा सिनेस्टाईल थरार : चोरलेली तार घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना पकडले !

पोलिसांचा सिनेस्टाईल थरार : चोरलेली तार घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना पकडले !

पोलिसांचा सिनेस्टाईल थरार : चोरलेली तार घेऊन जाणाऱ्या चोरट्यांना पकडले !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भादली वीज उपकेंद्राच्या परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास २० हजार रुपये किमतीची अॅल्युमिनियमची तार चोरी करून जाणाऱ्या रहीम खान रशीद खान, मोसीन शहा सिकंदर शहा, शाहरुख शहा सिकंदर शहा, अफजल खान उर्फ फावड्या रशीद खान (सर्व रा. तांबापुरा) या चौघांना एमआयडीसी पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, भादली वीज उपकेंद्राच्या परिसरातून मध्यरात्रीच्या सुमारास ९० हजार रुपये किंमतीची अॅल्युमिनियमची तार चोरी झाली होती. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरलेली तार घेऊन चोरटे जळगावकडे येत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. चोरटे अजिंठा चौफुलीकडून ईच्छादेवी चौफुलीकडे रिक्षातून तार घेवून जाताना दिसताच पथकाने त्यांचा पाठलाग करीत वरील रेकॉर्डवरील सराईत चौघं गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांनी भादली येथून चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून तार जप्त करण्यात आली आहे.

दरम्यान, ही कारवाई पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि दीपक जगदाळे, पोलिस नाईक प्रदीप चौधरी, किशोर पाटील, योगेश बारी, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, नाना तायडे, सिध्देश्वर डापकर यांनी केली

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या