पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन टोळक्यानी केला तिघांवर हल्ला !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्याच्या कारणावरुन टोळक्याने लोखंडी हातोडीसह लाकडी दांडक्याने तिघांवर अचानक हल्ला केला. यामध्ये धारदार चॉपरने भुषण पाटील याच्यावर वार केले. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवार दि. १६ रोजी सायंकाळच्या सुमारास शिरसोली प्र.न गावात घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, टोळक्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील शिरसोली प्र.न. येथे भगवान राजाराम पाटील (वय ३१) हा तरुण राहतो. बुधवारी सायंकाळीच्या सुमारास गावातील विशाल भील, दीपक भील हे काही लोखंडी हातोडा, लाठ्याकाठ्यांसह धारदार शस्त्रे घेवून त्यांच्या घरी गेले. त्याठिकाणी ते शिवीगाळ करीत भगवान कुठे आहे अशी विचारणा केली. त्यानंतर त्याने आमच्या विरुद्ध पोलिसात केलेली तक्रार मागे घेण्यास सांग असे म्हणत त्या टोळक्याने भगवान पाटील यांच्या वडीलांसह भाचा भूषण पाटील आणि काका अजय पाटील यांच्यावर हल्ला करुन मारहाण केली. या भांडणात गजानन भील याने त्याच्याजवळ असलेल्या चॉपरने भूषणवर वार केले. यामध्ये त्याच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत झाली असून राजाराम पाटील यांना देखील लाकडी काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले.
घटनेची माहिती मिळताच भगवान पाटील यांनी घराकडे धाव घेत तिघ जखमींना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी तिघांवर उपचार करण्यात आले. गुरुवारी सकाळी भगवान पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार विशाल भील, दीपक भील, विजय भील, सुकदेव भील, आकाश संजय नागपूरे, नितीन भील, सुभाष भील, सचिन भील, गजानन भील व अजय भील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे