पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल : अल्पवयीन बालिकेचा विनयभंग, एकाला अटक!
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील एका गावात एका व्यक्तीने अल्पवयीन बालिकेचा विनयभंग केल्याची घटना काल रात्री घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात सदर व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील डिगंबर राजाराम पाटील याने एका बालीकेस काल रात्री सात साडे सात वाजेच्या सुमारास हातवारे करून, अश्लील बोलून, दमदाटी व शिवीगाळ करून विनयभंग केला. या प्रकरणी आरोपीच्या विरुद्ध रावेर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर आरोपीस पोलीसांनी अटक केली असून त्यास येथील न्यायालया समोर उभे केले असता त्याची न्यायलयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.