प्रजासत्ताक दिनी पर्यावरण पूर्वक झाडे लावुन संगोपन करा – सुरेंद्रसिंग पाटील!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध प्रकारची पर्यावरणपूरक झाडे लावू संगोपनाचा संकल्प करू या तसेच निसर्गनिर्मित संपत्तीचे रक्षण करण्याचा व आपला परिसर गाव ,शहर स्वच्छतेचा संकल्प करा असे प्रतिपादक वृक्षप्रेमी डॉ. सुरेंद्रसिंग पाटील यांनी केले आहे .
आपल्या देशाच्या आजादीसाठी ज्यांनी बलिदान दिले तसेच आजादीसाठी लढले अशा सर्व स्वातंत्र्यवीरांना तसेच स्वातंत्र्य सैनिकांना नमन करत माननीय प्रधानमंत्री जी यांच्या आव्हानुसार 15 ऑगस्ट रोजी हर घर तिरंगा लगवाया व आदरणीय प्रधानमंत्री जी यांच्या संकल्पनेनुसार एक मा के लिये लावले अजून लावतच राहू स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी व आपल्या सुरक्षेसाठी बलिदान देण्यास तयार असलेले सर्व सैनिकांचे तसेच सीआरपीएफ व इतर प्यारा मिलिटरी चे तसेच राज्यात राज्य सरकारचे पोलीस विभागाचे त्यांच्यामुळे आपले जीवन सुरक्षित आहे.
सर्व आपल्यासाठी बलिदान देण्यास तयार आहेत त्यानुसार आपणही त्यांना आपल्या निसर्गनिर्मित संपत्तीचे रक्षण करून त्यात झालेली झीज भरून काढण्यासाठी विविध प्रकारचे झाडे लावून त्याचे 26 जानेवारी हा 75 वा प्रजासत्ताक दिन आहे.
त्या दिवशी लावलेले व नवीन लावणाऱ्या झाडांचे संगोपन करण्याचा तसेच आदरणीय प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेनुसार आपला परिसर गाव शहर स्वच्छतेचा या सर्वांचा संकल्प करून आपल्या रक्षणकर्त्यांना व झाडाला अभिवादन नमस्कार करून 26 जानेवारी ला झेंडावंदन करू या असे आवाहन त्यांनी देशवासीयांना केले आहे .