प्रभावी व्यक्तिमत्व विकासासाठी भाषा शब्द उच्चारण करणे गरजेचे – प्रा.इमरान खान
यावल दि.१७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्य डॉ. संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा. एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली भाषा प्रयोगशाळा मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक उर्दू विभागाचे प्रा.इमरान खान यांनी विद्यार्थ्यांना संगणक प्रात्यक्षिकावर मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात प्रभावी व्यक्तिमत्व विकासाच्या अनुषंगाने उर्दू, मराठी, इंग्रजी भाषा उच्चारणाला महत्व दिले पाहिजे. शब्द उच्चारण स्वर आणि ताल यावर ताण देऊन चांगले उच्चार शिकण्यास सक्षम करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दूरदर्शनवरील मुलाखती,गटचर्चा,सार्वजनिक ठिकाणी भाषणाला सामोरे जाण्यासाठी भाषा उच्चारणाचे प्रभावी प्रशिक्षण घेणे हा भाषा प्रयोगशाळेमधील उद्देश आहे.असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुधीर कापडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असताना संगणकाचे ज्ञान अवगत केले पाहिजे त्यासाठी महाविद्यालयामध्ये भाषा प्रयोगशाळा ही इलेक्ट्रॉनिक ध्वनी पुनरुत्पादन उपकरणांनी सुसज्ज असलेला कक्ष विद्यार्थ्यांना भारतीय भाषांबरोबरच परदेशी भाषांचे मॉडेल उच्चारण ऐकण्यासाठी अभ्यासाची संधी निर्माण झाली आहे असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.सुभाष कामडी यांनी केले तर आभार प्रा.रामेश्वर निंबाळकर यांनी मानले डॉ प्रल्हाद पावरा,डॉ.संतोष जाधव,प्रा.ईश्वर पाटील,प्रा.हेमंत पाटील,प्रा.प्रशांत मोरे,प्रा.प्रतिभा रावते,डॉ वैशाली कोष्टी,प्रा.नरेंद्र पाटील,प्रा.अक्षय सपकाळे उपस्थित होते.ह्यावेळी कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.