Wednesday, March 26, 2025
Homeजळगावप्राध्यापक प्रबोधनी कार्यक्रमाअंतर्गत ए.आय.टूल्स संदर्भात मार्गदर्शन.

प्राध्यापक प्रबोधनी कार्यक्रमाअंतर्गत ए.आय.टूल्स संदर्भात मार्गदर्शन.

प्राध्यापक प्रबोधनी कार्यक्रमाअंतर्गत ए.आय.टूल्स संदर्भात मार्गदर्शन.

यावल खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  येथील जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे व उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली ए.एस.टूल्स संदर्भात मार्गदर्शनपर कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.ईश्वर पाटील यांनी ए.आय.टूल्स संदर्भात माहिती देताना सांगितले की संगणकातील साध्या उपकरणांचा यात समावेश आहे.चार्ट जी.पी.टी. फोर,मीड जर्नी,बिगनिंग क्रेड,लेग सिक्स,शॉर्ट ए.आय,पीका लो, ऑडिओ पेन,मायक्रोसॉफ्ट, डिझायनर मार्केटिंगसाठी इंटरनेट अशा उपक्रमांचा समावेश होतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. सुधीर कापडे यांनी सांगितले की वर्तमान युगात प्रत्येकाला संगणकाचे ज्ञान अवगत करताना किंवा मोबाईल फोन वापरत असताना आँनलाईन ज्ञानाबरोबरच सर्वच आयकॉनचा अभ्यास करायला हवा गुगल सर्च केल्यास सर्व लगेच उपलब्ध होते.असे सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा इमरान खान यांनी केले तर आभार डॉ निर्मला पवार यांनी मानले.यावेळी कार्यक्रमाला डॉ.हेमंत भंगाळे,डॉ.प्रल्हाद पावरा, प्रा.राजू तडवी,डॉ.वैशाली कोष्टी,प्रा. नरेंद्र पाटील,प्रा.प्रा सुभाष कामडी,
प्रा.हेमंत पाटील,प्रा.सी.टी.वसावे, प्रा.अर्जुन गाढे,प्रा.अक्षय सपकाळे, प्रा.प्रशांत मोरे,रामेश्वर निंबाळकर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी मिलिंद बोरघडे,संतोष ठाकूर,दुर्गादास चौधरी,प्रमोद भोईटे,रमेश साठे यांच्याबरोबरच महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रम.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या