Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाप्रेमसंबंध तोडल्याच्या राग अन तरुणाने केले फोटो व्हायरल !

प्रेमसंबंध तोडल्याच्या राग अन तरुणाने केले फोटो व्हायरल !

प्रेमसंबंध तोडल्याच्या राग अन तरुणाने केले फोटो व्हायरल !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणाने तरुणीसोबत काढलेल्या फोटोवर अश्लिल शिवीगाळ लिहून तो इन्सटाग्रावर स्टोरी ठेवला. हा धक्कादायक प्रकार दि. ५ रोजी उघडकीस आला. याप्रकरणी त्या तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील एका परिसरात तरुणी वास्तव्यास असून ती शिक्षण घेत आहे. गेल्या काही वर्षांपुर्वी गावात राहणारे तिचे काका मयत झाल्याने ती कुटुंबियांसह त्यांच्या घरी गेली होती. याठिकाणी तिच्या काकांचा भाच्यासोबत त्या तरुणीची ओळख झाली. त्यांच्यात नेहमी फोनवर बोलणे होत असल्याने त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. यावेळी त्यांनी सोबत फोटो देखील काढले होते. त्यानंतर तरुण दारुच्या नशेत तरुणीवर संशय घेवून भांडण करीत असल्यामुळे तरुणीने त्याच्यासोबत संबंध तोडून टाकले होते. प्रेमसंबंध तोडल्याचा राग आल्याने त्याने तीन वर्षांपुर्वी रात्रीच्या सुमारास तरुणीसोबतचे फोटो त्यांच्या कॉमन व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केला होता. त्यावेळी त्या दोघांच्या नातेवाईकांची बैठक होवून तरुणाने त्या तरुणीचे फोटो डिलीट केले आणि तरुणीसोबत यापुढे कोणतेही संबंध ठेवणार नाही अशी हमी दिली होती. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती.
तरुणीचे काका आणि मावशी हे दोन दिवसांपुर्वी दि. ५ रोजी त्यांच्याकडे आले होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारास तरुणाने त्याच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तरुणीसोबतचा फोटो आणि त्यावर अश्लिल भाषेत शिवी लिहून तो फोटो स्टोरीवर ठेवला होता. त्याचे स्क्रिनशॉर्ट तरुणीच्या काकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये काढून ठेवले आहे. त्यानंतर दोन तासानंतर त्याने ती स्टोरी डिलीट केली होती. तरुणीचे कुटुंबिय हे तीचे लग्न जमविण्यासाठी स्थळ शोधत आहे.

दरम्यान, त्या तरुणाला समजल्यामुळे त्याने तरुणीचे लग्न मोडावे किंवा जमू नये या हेतूने त्या तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान, तरुणीने तात्काळ शनिपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या