Wednesday, March 26, 2025
Homeभुसावळफुगा विधानसभेत पोहचणार : अपक्ष उमेदवार स्वाती जंगले !

फुगा विधानसभेत पोहचणार : अपक्ष उमेदवार स्वाती जंगले !

फुगा विधानसभेत पोहचणार : अपक्ष उमेदवार स्वाती जंगले !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार स्वाती कुणाल जगंले यांनी जळगाव रोडवरील लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचे नारळ फोडले. त्यानंतर ढोलताशांच्या गजरात जुना सातारा भागात प्रचार फेरी काढुन मतदारांचे आशिर्वाद घेत जामनेर रोडवरील प्रचार कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली आहे.
तोरण महाजन यांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचे उद्घघाटन करण्यात आले. स्वाती जंगले यांच्या प्रचार फेरीला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे रॅली मध्ये तरुण पिढी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व प्रचारकांच्या हातात फुगा होता. आता हा फुगा विधानसभेत आम्ही पोहचवल्याशिवाय राहणार नाही असे लेवा पाटीदार समाजातील बांधवाकडुन म्हटले जात आहे.यावेळी अपक्ष उमेदवार स्वाती कुणाल जंगले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की आमचे कार्यालय सुरू होऊ नये यासाठी विरोधकांनी खुप प्रयत्न केले. अप्रत्यक्षरीत्या धमक्या दिल्या पण आम्ही धमक्यांना घाबरत नाही. आमच्या उमेदवारी मुळे त्यांच्या तंबुत घबराट निर्माण झाली आहे.आमची उमेदवारी जनतेसाठी आहे.गेले कित्येक वर्षात भुसावळच्या जनतेला अनेक असुविधांना सामोरे जाण्याची वेळ कुणामुळे आलेली आहे हे जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे.पाण्यापासून वंचीत राहण्याची वेळ कुणामुळे आली आहे? मणक्याचे व पाठीचे आजार कुणामुळे सहन करावे लागत आहे.
यासर्व गोष्टीशी जनता चांगल्या प्रकारे परिचित असून आता या त्रास कायमचा मिटवण्याची वेळ आलेली आहे व आम्हाला सर्व समाजाचा पाठिंबा मिळत आहे.जनतेच्या आशिर्वादाने नक्कीच विधानसभेत पोहचु असा विश्वास स्वाती जंगले यांनी व्यक्त केला आहे. यावेळी विशाल नारखेडे, तोरण महाजन, बापू महाजन, मुकेश गुंजाळ सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या