फुलगावच्या विकास कामात राजकिय हस्तक्षेप नको
फुलगांव ग्रामसभेत नागरीकांचा सुर
फुलगावच्या विकास कामात राजकीय हस्तक्षेप असल्याने गावाचा विकास थांबला आहे तरी या राजकीय हस्तक्षेप थांबवावा अशी एक मुखी मागणी फुलगाव येथील ग्रामसभेत करण्यात आली आहे .
विकास कामात अडथळा येत असेल असल्याने फुलगांवचे लोकनियुक्त सरपंच श्याम फुलगाव कर ,
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक महेंद्र पाटील , सदस्य सचिन पाटील , सदस्या कविता चौधरी ,
यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर ग्रामसभा घेण्यात आली .
याप्रसंगी ग्रामपंचायत मधील निवडून आलेल्या आठ ग्रामपंचायत सदस्यांनी सभेला उपस्थिती दिली नाही ,त्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता .
याप्रसंगी गावाच्या पाणीपुरवठ्यासाठी तराफा मोटर बसवली गेली आहे तिथे बिल सुद्धा अदा करण्यात यावे .
पाणीपुरवठा ठिकाणी काढण्यात गाळा ची मजुरी सुद्धा देण्यात यावी , तसेच भिल वस्तीतील थांबलेले काम त्वरीत सुरू करण्यात यावे .
नियमाप्रमाणे एक लाखाच्या आतील कामे करण्याचा अधिकार सरपंचाना आहे ते कामे सुरू करण्यात यावे .
त्याचप्रमाणे गावात जो विकास हस्तक्षेप करत असेल त्याच्यावर कारवाई करण्यात यावी .
गावात कायमस्वरूपी ग्रामसेवक नेमावा अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली आहे .
यावेळी ग्रामस्थांनी आपल्या समस्या सुद्धा ग्रामसभेत मांडल्या होत्या तसेच गावात राजकीय हस्तक्षेप करणारा वर व बिल रोखणार्याची कलेक्टरकडे तक्रार करावी असे सुद्धा यावेळी ठरवण्यात आले आहे .
सदर बिल न काढण्यात आल्यास सरपंच यांच्या उपोषणास पाठींबा ग्रामसभेत देण्यात आला . पुढील मासिक सभाही प्रांगणात घेण्यात यावी असे ग्राम सभेत ठरविण्यात आले .
ग्रामसभेत विलास पाटील ,सुरेश पाटील ,प्रभाकर पाटील , ,सुरेश चौधरी , शशिकांत पाटील ,निलेश पाटील, अशोक रघुनाथ पाटील ,धिरज प्रभाकर पाटील , सुरेश लोटू ओलाकार ,युवराज नरेश आलोकार ,महेद्र राजेद्र पाटील ,सागर चंद्रकांत पाटील,मोहित किरण पाटील ,कल्पेश दिलीप चौधरी ,आदर्श आठे ,सागर विजय सोनवणे , देविदास सुरेश आलोकार ,हरी पंढरीनाथ चौधरी ,अनिल रामचंद्र चौधरी ,श्रीराम पुरी गोसावी , ज्ञानदेव सपकाळे , सुभाष पाटील आदी अंगणवाडी सेविका ,मदतनीस, आशावर्कर यांच्या सह मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते .