Thursday, March 27, 2025
Homeजळगावफैजपूर उपविभागीय व अधिकारी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना मूलभूत सुविधेसाठी निवेदन

फैजपूर उपविभागीय व अधिकारी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना मूलभूत सुविधेसाठी निवेदन

फैजपूर उपविभागीय व अधिकारी मुख्याधिकारी नगरपरिषद यांना मूलभूत सुविधेसाठी निवेदन
फैजपुर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी

फैजपूर शहरात २ मार्च पासून इस्लाम धर्मातील सर्वात पवित्र महिना रमजान उपवास (रोजे) सुरू होत आहे. शहरात स्वछता व नियमित पाणी पुरवठा, जंतू नाशक फवारणी करण्यासाठी फैजपूर येथील एम मुसा जन विकास असंघटित गवंडी कामगार संघटना श्रमिक कोहेनूर कामगार संघटना नाशिक विभाग तर्फे प्रांत अधिकारी साहेब व मुख्य अधिकारी साहेब नगर परिषद यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली की, फैजपूर शहरात पिण्याचे पाणी वेळेवर सोडण्यात येत नाही, केव्हाही पाणी येते तरी रमजान महिण्यात इस्लाम धर्म मानणारे सर्व लोकं नमाज पठण साठी पाणी आवश्यक गरज असते यासाठी पाण्याचा वेळ निश्चित करावे व शहरात स्वछता राखावी. शहरात जंतुनाशक फवारणी करावी. शहरातील सर्व नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी नगरपरिषदेचे प्रशासक अधिकारी उपविभागीय अधिकारी, नगरपालिका मुख्य अधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन नागरिकांना होणारा मानसिक त्रास दूर करावा अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. निवेदनावर कामगार संघटनेचे अध्यक्ष शाकीर मलिक, मुसा सुलतान कुरेशी, कमरुद्दीन शेख मिस्तरी, नौरोदिन मिस्तरी, हमीद शाह सहित असंख्य कामगार उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या