फैजपूर येथील ५६ वर्षीय इसम बेपत्ता ; फैजपूर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
येथील ५६ वर्षाचा तरुण घरातून हळद घेण्यासाठी जातो असे सांगून निघून गेला. सदरचे वृत्त अशी की, फैजपूर येथील पार्वती नगर मधील रहिवासी युवराज मधुकर फिरके ५६ वर्षीय इसम दि.२३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास फैजपूरातून राहत्या घरातून हळद बघण्यासाठी जातो असे सांगून निघून गेला आहे. त्याचा परिसरात शोध घेतला असता मिळून आला नाही. याबाबत फैजपूर पोलीस स्टेशनला वडील मधुकर फिरके यांच्या फिर्यादीवरून मिसिंग तक्रार दाखल झाली असून ए.पी.आय रामेश्वर मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार करीत आहे. युवकाची माहिती मिळाल्यास संपर्क साधावा फैजपूर पोलीस स्टेशन फोन नंबर – ०२५८५-२४५२३४, तपासी अंमलदार मोबाईल क्र.९९२३००१६९४ वर संपर्क साधावा.