Monday, March 17, 2025
Homeविधानसभाफैजपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन !

फैजपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन !

फैजपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेचे आयोजन !

फैजपूर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – लोकांचा प्रतिसाद बघता महाराष्ट्रात सर्वात जास्त महायुतीचे उमेदवार निवडून येतील व परत महायुतीची सत्ता येईल अशी अपेक्षा केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री खा. रक्षा खडसे यांनी व्यक्त केली.
फैजपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी फैजपूर येथील जे.टी.महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मैदान, बऱ्हाणपूर- अंकलेश्वर हायवे,साखर कारखाना फैजपूर येथे प्रचार सभा आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने फैजपूर येथील भाजपा शहर कार्यालय ( शुभ दिव्य मंगल कार्यालय) येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय क्रीडा राज्य मंत्री खा. रक्षा खडसे यांनी सांगितले की, विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात माहोल चांगला असून लोकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. येथे आयोजित सभेत २० ते २५ हजार लोकांचा सहभाग बघायला मिळणार आहे. येणाऱ्या दिवसांत केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे दिसणार आहे. तसेच लोकांचा प्रतिसाद बघता महाराष्ट्रात सर्वात जास्त संख्येने महायुतीचे उमेदवार निवडून येतील व परत महायुतीची सत्ता येईल. रावेर लोकसभा निवडणुकीत यश आले त्याचप्रमाणे रावेर विधानसभा निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पत्रकार परिषदेला राज्यसभा खा.बन्सीलाल गुजर, डॉ. कुंदन फेगडे, डॉ. राधेश्याम चौधरी, पांडुरंग सराफ, विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपूत, सुरेश धनके, गणेश नेहते, भरत महाजन, संदीप पाटील, हरलाल कोळी, उमेश फेगडे, राजन लासुरकर, विष्णू पारधे, अंकुश महाराज, शहराध्यक्ष पिंटू तेली, संजय सराफ यांची प्रमुख उपस्थिती होती.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या