फैजपूर शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी इदू पिंजारी तर उपाध्यक्ष पदी प्रा. उमाकांत पाटील
फैजपूर : खान्देश लाईव्ह प्रतिनिधी
वार्ता फाउंडेशन पत्रकार संघटनेची वार्षिक कार्यकारिणीची बैठक रविवार, फैजपूर येथे उत्साहात पार पडली. यावेळी एकमुखी निर्णय घेत, इदू पिंजारी यांची फैजपूर शहर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. तर उपाध्यक्षपदी प्रा. उमाकांत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. माजी अध्यक्ष मयूर मेढे यांनी अध्यक्षपदाचा पदभार इदू पिंजारी यांच्याकडे सुपूर्द केला.
कार्यकारिणीच्या या नव्या संघटनेत विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. सचिवपदी संजय सराफ, सहसचिवपदी राजू तडवी, खजिनदारपदी अरुण होले, कार्याध्यक्षपदी प्रा. राजेंद्र तायडे, तर प्रसिध्दी प्रमुख म्हणून मयूर मेढे यांची निवड करण्यात आली. कार्यकारिणीत सन्माननीय सदस्य म्हणून वासुदेव सरोदे, योगेश सोनवणे, शाकीर मलिक, सलीम पिंजारी, शेख कामिल यांचा समावेश करण्यात आला. या बैठकीदरम्यान संघटनेच्या भविष्यातील दिशा आणि उद्दिष्टांवर चर्चा करण्यात आली.
कार्यकारिणीच्या नव्या सदस्यांचे सर्व उपस्थितांनी अभिनंदन करत संघटनेला पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. नव्या कार्यकारिणीने पत्रकारांच्या समस्या सोडवण्यावर तसेच सामाजिक जबाबदारी पार पाडण्यासाठी संघटनेच्या भूमिकेवर भर देण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन माजी अध्यक्ष मयूर मेढे यांनी केले.