Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाफोटो, व्हिडीओसह कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

फोटो, व्हिडीओसह कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

फोटो, व्हिडीओसह कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत विवाहितेवर अत्याचार !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – चाळीसगाव शहरातील विवाहितेला तिचे फोटो, व्हिडीओ आणि कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार करण्यात आला. आरोपीने शिवीगाळ करीत पोलिसात तक्रार दिल्यास परिवाराला संपवून टाकेल, अशी धमकी दिली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात एका तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील एका भागातील विवाहिता परिवारासह वास्तव्याला आहे. संशयित आरोपी तुषार उर्फ सागर बाबुराव बोरसे याने एके दिवशी तिचा पाठलाग केला. तसेच विवाहितेचे फोटो, व्हिडीओ आणि कॉल रेकॉर्डिंग तिच्या पतीला पाठविण्याची धमकी दिली.त्यानंतर संशयित आरोपी तुषार बोरसे याने विवाहितेला दुचाकीवर बसवून मित्राच्या रूमवर नेले व ज्यूसमध्ये गुंगीचे औषध देत तिच्यावर अत्याचार केला. याबाबत कुणाला सांगितले किंवा पोलिसात तक्रार दिली तर परिवाराला ठार मारेल, अशी धमकी दिली. २ जुलै ते आजपर्यंत हा प्रकार घडला. दरम्यान, हा प्रकार सहन न झाल्याने विवाहितेने चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

दरम्यान, संशयित आरोपी तुषार उर्फ सागर बाबुराव बोरसे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर कोते हे करीत आहेत

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या