Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाबंदुकीशी खेळताना गोळी सुटली, सराईत गुन्हेगार गंभीर

बंदुकीशी खेळताना गोळी सुटली, सराईत गुन्हेगार गंभीर

बंदुकीशी खेळताना गोळी सुटली, सराईत गुन्हेगार गंभीर !

चाळीसगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बंदुकीशी आरशात बघून खेळत असताना अचानक गोळी सुटली आणि यात गोळी डाव्या गालाला चाटून गेल्याने तरुण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ही घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास बस स्टँडच्या पाठीमागील परिसरात घडली. मंजितसिंग दिलीपसिंग बावरी (२०, रा. बस स्टँडच्या पाठीमागे, चाळीसगाव) असे या जखमी तरुणाचे नाव आहे. मंजितसिंग बावरी हा त्याच्याजवळील शस्त्र हाताळत असताना त्यातून सुटलेली गोळी लागून जखमी झाला. या घटनेनंतर त्याला तत्काळ परिसरातील लोकांनी खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पोलिस तपासात पुढे असे समजले की मंजितसिंगकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नव्हता उपनिरीक्षक कैलास पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून बावरी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताविरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असून प्रतिबंधक कारवाई देखील झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या