बंद घर चोरट्यांनी फोडले; २ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – एसटी वर्कशॉपजवळ राहणाऱ्या एका सोनार कारागिराचे बंद घर फोडून घरातून २ लाख रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता उघडकीस आली. या प्रकरणी बुधवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, सुरेश हिरामण सोलंकी (वय ४१, रा एसटी वर्कशॉप) यांचे घर बंद असताना २५ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे लोखंडी गेटचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि ४० हजार रुपयांची रोकड असा एकूण २ लाख रूपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. या प्रकरणी सुरेश सोलंकी यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.