Sunday, April 27, 2025
Homeजळगावबसवाहकाने केली महिला प्रवाशाला मारहाण !

बसवाहकाने केली महिला प्रवाशाला मारहाण !

बसवाहकाने केली महिला प्रवाशाला मारहाण !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बसमध्ये प्रवास करतांना बॅग ठेवण्यावरून वाहक व प्रवाशामध्ये वाद होऊन झटापट झाली. या झटापटीत वाहकाचा चष्मा तुटला तर प्रवासी महिलेच्या नाकाजवळ दुखापत झाली. वाहकानेच या महिलेला मारहाण केल्याचा आरोप तिच्या पतीने केला. या वादात पाऊण तास बस खोळंबण्यासह अन्य प्रवासी ताटकळत बसले होते. हा वाद पोलिस ठाण्यापर्यंत गेला व बसही पोलिस ठाण्यात नेण्यात आली. मात्र दोघांमध्ये तडजोड होऊन बस पुढील प्रवासाकरीता मार्गस्थ झाली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, शहरातील नवीन बस स्थानकातून मंगळवार दि. २५ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जळगाव ते चाळीसगाव ही बस बसस्थानकातून निघाली. ती बस प्रवाशांना घेवून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचत नाही तोच प्रवासी आणि वाहकाकमध्ये वाद उद्भवला. वावडदा येथे जाणारा प्रवासी त्याची बॅग ठेवत असताना ही बॅग प्रवाशांच्या डोक्यात पडू शकते, त्यामुळे ती पुढे ठेवा, असे वाहकाने सांगितले. मात्र तरीही प्रवासी ती बॅग वर ठेवत असल्याने वाद सुरू झाला. या झटापटीत वाहकाचा चष्मा तुटला. तसेच या प्रवाशाच्या पत्नीच्या नाकालाही दुखापत झाली. त्यानंतर प्रवाशाने संपात व्यक्त करीत बस थांबविली. वाहकानेच आपल्या पत्नीला मारल्याचा आरोप त्याने केला. तर या प्रवाशाने चष्मा तोडल्याचा आरोप वाहकाने केला.
वाहक आणि प्रवाशातील वाद मिटत नसल्याने चालकाने बस थेट जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात आणली. याठिकाणी पोलिसांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात महिला व वाहकांनाही नेण्यात येऊन उपचार करण्यात आले. त्यानंतर मात्र दोघांमध्ये तडजोड होऊन ही बस मार्गस्थ झाली. या सर्व प्रकारात उकाड्यामध्ये अन्य प्रवासी ताटकळले होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या