Sunday, March 16, 2025
Homeक्राईमबस ओव्हरटेक करण्यावरून वाद...बस चालकाला जबर मारहाण !

बस ओव्हरटेक करण्यावरून वाद…बस चालकाला जबर मारहाण !

बस ओव्हरटेक करण्यावरून वाद…बस चालकाला जबर मारहाण !

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – बस ओव्हरटेक करण्यावरून वाद झाल्याने ट्रॅव्हल्स चालकाने एसटी चालकाला मारहाण केल्याची घटना चोपडाई-कोंढावळ तपासणी नाक्याजवळ घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, चोपडा बसडेपोत चालक असलेल्या भटू निळकंठ पाटील (४६) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ते २५ रोजी सायंकाळी पुणे येथून चोपडा बस (एमएच०९/ईएम ९६५३) घेऊन निघाले होते. २६ रोजी सकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास फागणेजवळ बस जात असताना पुढे असलेल्या विनोद ट्रॅव्हल्सच्या खासगी बसला (एमएच०९/सीव्ही २७०९) ओव्हरटेक करत असताना चालकाने बाजू न देता जोरात गाडी पुढे घेतली.समोरून ट्रक असल्याने एसटी चालक भटू पाटील यांना अचानक ब्रेक लावला. त्यामुळे उभा असलेला एक प्रवासी खाली पडला. ट्रॅव्हल्स चोपडाई-कोंढावळ तपासणी नाक्याजवळ उभी असताना बस चालक भटू पाटील यांनी ट्रॅव्हल्स चालकाला जाब विचारला.
दरम्यान, ट्रॅव्हल्स चालक दैवत वाल्मिक पाटील (जळोद) याला राग आल्याने त्याने बसच्या दरवाजाला लाथा मारत भटू पाटील यांना शिवीगाळ करत चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी प्रवासी व वाहक यांनी पाटील यांची सोडवणूक केली. तपास हेकॉ. कैलास शिंदे हे करीत आहेत.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या