बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून एकाची हत्या!
पुणे वृत्तसंस्था – गेल्या काही महिन्यापासून राज्यातील अनेक ठिकाणी छोट्या मोठ्या कारणाने गुन्हेगारी वाढत असतांना नुकतेच पुणे शहरातील दांडेकर पूल परिसरात बहिणीसोबत असलेल्या प्रेमसंबंधाच्या संशयातून तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, याप्रकरणी पर्वती पोलिसांनी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.कौस्तुभ जयदीप नाईक (२९ रा. सदाशिव पेठ ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पंकज नांगरे (३१, रा. दांडेकर पूल) याने पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. कौस्तुभचे आरोपीच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते. तुझ्या बहिणीला मी पळवून घेऊन जाईल, अशी धमकी त्याने दिली होती. याच रागातून आरोपीने साथीदारांना दांडेकर पूल परिसरात त्याला बोलावून घेतले. त्यानंतर त्यांनी कौस्तुभला गाठून त्याला बेदम मारहाण केली. लाथा-बुक्क्यांसह काठीने मारहाण करून त्याचा खून केला. त्यानंतर टोळके पसार झाले, असे पोलिसांनी सांगितले.दांडिया खेळताना एका तरुणावर धारदार कोयत्याने वार करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगारांना भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. अमित दीपक चोरगे (२७), अक्षय किसन सावंत (२८), अजय किसन रांजणे (२६), प्रसाद दत्तात्रय रांजणे (२२), सिद्धेश शिवाजी सणस (२६), विजय रघुनाथ रांजणे (१९, सर्व रा. आंबेगाव खुर्द) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.
दरम्यान, हल्ल्यात अर्जुन दिलीप मोरे (१९) गंभीर जखमी झाला होता. मोरे आणि त्याचा मामाचा मुलगा कात्रज भागातील संतोषनगर परिसरात आठ ऑक्टोबर रोजी रात्री दांडियाचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेले होते. त्या वेळी सराईत गुन्हेगार अमित चोरगे आणि साथीदार त्या ठिकाणी आले. या वेळी आरोपींनी त्याच्यावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून जखमी केले.