बालविवाहातून पीडित मुलगी गरोदर ; गुन्हा दाखल!
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – पीडित मुलगी १४ वर्षांची असताना तिच्या आई-वडिलांनी तिचा विवाह यावल तालुक्यात राहणाऱ्या एका मुलासोबत लावून दिला. त्यानंतर ही मुलगी १६ वर्षांची असतानाच गर्भवती राहिली आहे. या प्रकरणी पतीसह तिच्या नातेवाईकांविरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,सांगली जिल्ह्यातील एका गावात राहणाऱ्या १६ वर्षीय मुलीचा दोन वर्षांपूर्वी १४ वर्षे वय असताना तिच्या आई-वडिलांनी यावल तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या मुलासोबत विवाह लावून दिला होता. ही मुलगी अल्पवयीन असताना गर्भवती राहिली आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो यावल तालुक्यात वर्ग केला आहे. या प्रकरणात पीडित मुलीचा नवरा, सासरा, सासू आणि आई यांच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करत आहेत.
अर्चना पाटील ही ठाणे पोलिस दलात दाखल होण्यापूर्वी मुंबई महापालिकेत काम करायची. तेथे मिरखा नुरखा तडवी हादेखील तेथे कामाला होता व तेथे दोघांची ओळख झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यानंतर अर्चना पाटील पोलिस दलात दाखल झाल्यानंतर जळगावला बदली झाली तरी तडवी व तिची मैत्री कायम आहे. फसवणुकीच्या या प्रकरणातही तडवीविरुद्ध गुन्हा दाखल असून त्याच्या खात्यावर काही रक्कम स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पोलिस त्याचा शोध घेत होते. अखेर शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तडवी याला रावेर तालुक्यातून ताब्यात घेतले.