Sunday, April 27, 2025
Homeजळगावबिड हत्या प्रकरणी यावल तालुका सकल मराठा समाजातर्फे तिव्र निषेध -- कठोर...

बिड हत्या प्रकरणी यावल तालुका सकल मराठा समाजातर्फे तिव्र निषेध — कठोर कारवाईची मागणी

बिड हत्या प्रकरणी यावल तालुका सकल मराठा समाजातर्फे तिव्र निषेध — कठोर कारवाईची मागणी

यावल दि.२७ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घूण हत्येची व परभणी येथील दलित तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील झालेल्या संशयास्पद मृत्यूच्या निष्पक्ष चौकशी बाबत आणि त्यांचे वर कठोर कारवाई करणे बाबत यावल तालुका सकल मराठा समाजाचे वतीने शुक्रवारी तहसील कार्यालयात निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांना निवेदन सादर करत कठोर कारवाईची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केले आहे की, बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील तरुण सरपंच संतोष देशमुख यांची निर्घूण हत्या करून त्यांच्या हत्येचे व्हिडिओ सोशल मीडियावर दाखवून राक्षसी कृत्य करून आरोपी फरार आहेत या हत्येतील संपूर्ण आरोपींना पोलीसांनी अद्यापही अटक केलेले नाही .या हत्येतील गुन्हेगार , कायद्याला न मान्य मानणारे तसेच निडर असून त्यांना राजाश्रय असल्याचे समाजातून बोलले जात आहे . संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे हत्या करण्यात आली त्या प्रकारची हत्या देशात आजपर्यंत झाली नसल्याचेही निवेदनात नमूद आहे. सरपंच देशमुख यांच्या हत्येचे मारेक-यासह त्या मागील सूत्रधार कोण आहे हे शोधून काढून त्यांचेवर कठोर कारवाई करावी यासह संविधान रक्षणासाठी लढणारे परभणी येथील तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीसांनी कस्टडीत डांबून त्यांना मारहाण केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा त्यांच्या कुटूंबियाकडून व समाजातून आरोप होत आहे. या दोन्ही घटना संस्कारी महाराष्ट्र करीता लांच्छनास्पद आहेत दोन्ही घटनांची निष्पक्ष आणि न्यायालयीन चौकशी करून दोषींना तातडीने अटक करून फाशीची शिक्षा द्यावी. अशी मागणी निवेदनात केली आहे
निवेदन देतेवेळी रवींद्र सूर्यभान पाटील, लक्ष्मण पवार ,दत्तात्रय बाजीराव पाटील, नानाजी प्रेमचंद पाटील ,अतुल निळकंठ यादव ,सुनील गावडे प्रा.मुकेश येवले, किरण शिंदे ,बापू जासूद, नरेंद्र पाटील ,तेजस पाटील ,तुषार येवले ,निलेश पवार, अशोक पाटील ,वसंत पाटील ,ललित पाटील, हेमंत येवले, मनोज येवले,अशोक पाटील ,गणेश येवले, नरेंद्र पाटील ,लहू पाटील, प्रा. सी,.के पाटील ,ईश्वर पाटील, मिलिंद बारेमधे, प्रा. संजय पाटील, संतोष पाटील ,निलेश पवार, पंकज पवार ,गणेश येवले, यांचे सह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या