बीएसएफ जवानाचे तीन महिन्यांपासून बंद असलेले घर चोरट्यांनी फोडले !
एरंडोल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील कासोदा येथील अष्टविनायक नगरमध्ये राहणाऱ्या व दिल्लीतील बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये नोकरीस असलेल्या जवानाचे तीन महिन्यांपासून बंद असलेले घर फोडून घरातील सोने, चांदीच्या दागिने व काही वस्तुंसह १० हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरुन नेला आहे. याप्रकरणी बॉर्डर सिक्युरिटी फोर्समधील जवानाचे बंधू कैलास सोनवणे यांच्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात २७ फेब्रुवारीला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये नोकरीस असलेले विलास शांताराम सोनवणे हे दिल्लीत नोकरीला असल्याने गत ३ महिन्यांपासून त्यांचे पारोळा ते फरकांडे चौकातील अष्टविनायक नगरातील घर बंद होते.
दरम्यान, चोरट्यांनी लाभ घेत २२ फेब्रुवारीला घरफोडी केली. चोरट्यांनी सोने, चांदीच्या वस्तू, सहकारातील काही रकमा चोरून नेल्याची फिर्याद कैलास सोनवणे यांनी दिली आहे.