Sunday, April 27, 2025
Homeजळगावबौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली.

बौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली.

बौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली.

यावल दि.४.    खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
आज शुक्रवार दि.४ एप्रिल २०२५ रोजी तहसीलदार यावल व पोलीस निरीक्षक यावल यांना बिहार मधील महाबोधी महाविहार बचाव आंदोलन मोर्चाची परवानगी मिळण्यासाठी सर्व बौद्ध समाजातील सामाजिक कार्यकर्ते यांनी मोर्चासाठी परवानगी मिळण्याबाबत पत्र दिले.
बौद्धगया बिहार मधील महाबोधी महाविहार पंडित ब्राह्मणांच्या ताब्यातील मुक्त करण्यासाठी व बीटी ॲक्ट 1949 कायदा रद्द करून बौद्धांच्या ताब्यात महाबोधी महाविहार देण्यात यावे यासाठी यावल शहरातील यावल तालुक्यातील समाज बांधव यांच्या वतीने दिनांक 11 /4 / 2025 शुक्रवार रोजी भव्य मोर्चा आयोजन करण्यात आलेला आहे दिनांक 12 फेब्रुवारी पासून आज पर्यंत देशा देशातील तमाम धम्म गुरु भन्तेजी बुद्धगया येथे आंदोलन करीत आहे परंतु बिहार सरकार त्याची दखल घेत नाही म्हणून जगातील सर्व बौद्ध राष्ट्र व अनेक राष्ट्र बौद्ध गयेतील आंदोलन यांना पाठिंबा देत आहे बिहार मधील धम्म गुरु भन्तेजी जे आंदोलन करीत आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाभोवती महाविहार भूमीसाठी भव्य मोर्चाचे आंदोलन करण्यात येत आहे तर मोर्चाचे आरंभ बोरावल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर यांच्या पुतळ्यापासून मेन रोड तहसील कार्यालयावरती करण्यात येईल मोर्चाची वेळ दुपारी 12 वाजता नियोजित करण्यात आलेली आहे निवेदनावर पुढील प्रमाणे सही मनोहर सोनवणे अशोक बोरेकर अरुण गजरे शांताराम मांगो तायडे लक्ष्मीताई मेढे सुपडू संतांशू सुमित निकम बबलू गजरे सतीश अडकमोल अनिल जंजाळे गौतम गजरे अशोक तायडे आदींच्या स्वाक्षऱ्या चे निवेदन देण्यात आले

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या