ब्रेकिंग यावल पश्चिम वनक्षेत्रपालाचे कार्यक्षेत्रात बिबट्याच्या हल्ल्यात आदिवासी अल्पवयीन मुलगा झाला ठार.
आईच्या हातातून मुलाला बिबट्याने ओढले.
यावल पूर्व पश्चिम विभागात जनजागृतीचा अभाव.
यावल दि.६ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव वन विभागाच्या कार्यक्षेत्रातील यावल येथील पश्चिम वनक्षेत्रपाल सुनील भिलावे यांच्या कार्यक्षेत्रात किनगाव साकळी परिसरात मानकी शिवारात आज गुरुवार दि.६ मार्च २०२५ रोजी दुपारी २ ते ३:३० वाजेच्या सुमारास केशा प्रेमा बारेला वय ७ हा आदिवासी मुलगा त्याच्या आईचा हात धरून जात असताना
बिबट्याने हल्ला करून आईच्या हातातून प्रेमा बारेला यास फरपटत ओढत नेऊन जखमी केल्याने सात वर्षाचा आदिवासी बालक जागीच ठार झाल्याची घटना घडल्याने साखळी किनगाव परिसरासह संपूर्ण यावल तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून यावल पूर्व व पश्चिम वन विभागाच्या भोंगळ कारभाराकडे आणि आदिवासी बांधवांसह जनतेमध्ये वन विभागाच्या कामकाजाचे,

मार्गदर्शनाबाबत आणि या घटनेबाबत प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींनी भ्रमणध्वनी वरून पश्चिम वन विभागाचे वन क्षेत्रफळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद न दिल्याने तसेच जनजागृती बाबत दुर्लक्ष होत असल्याबाबत जळगाव वन विभागाचे उपवनसंरक्षक ( यावल प्रादेशिक ) जमीर शेख यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संपूर्ण सातपुडा डोंगरासह चोपडा,यावल,
रावेर तालुक्यातील होत आहे.