Tuesday, April 29, 2025
Homeजळगावभंगाराच्या दुकानाला शॉर्टसर्किटने भीषण आग !

भंगाराच्या दुकानाला शॉर्टसर्किटने भीषण आग !

भंगाराच्या दुकानाला शॉर्टसर्किटने भीषण आग !

अमळनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मंगरूळ येथे प्लास्टिक भंगाराच्या दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे ७ ते ८ लाखांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे बंब वेळीच गेल्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मंगरूळ येथे २० रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसीमध्ये सय्यद मुझफ्फर अली मोहम्मद अली यांच्या प्लास्टिक भंगार साहित्य त्यांच्या शेडच्या बाहेर मोठ्या प्रमाणात ठेवलेले होते. जवळच विद्युत ट्रान्सफार्मर होता आणि तेथून विद्युत तार गेलेली होती. अचानक विद्युत तारा तुटून प्लास्टिक भंगाराला आग लागली प्लाटिकने लगेच पेट घेतल्याने आगीचे प्रमाण वाढले. परिसरात धावपळ सुरू झाली. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना कळविताच त्यांनी आगीचे दोन बंब पाठवले. अग्निशमनदल प्रमुख गणेश गोसावी, फारुख शेख, जफर पठाण, सत्येन संदानशिव, दिनेश बिन्हाडे, आकाश संदानशिव, योगेश कंखरे, आकाश बाविस्कर, विक्की भोई यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले.

घटनेचे वृत्त कळताच पोलिस निरीक्षक विकास देवरे, सिद्धांत शिसोदे, नितीन कापडणे, चालक सुनील पाटील, पोलिस पाटील भागवत पाटील पोहोचले. आगीचे मोठे लोळ उठत असल्याने जवळ जाता येत नव्हते. इतर साहित्यदेखील काढता येत नव्हते.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या