भरधाव ट्रक उलटला अन २२ मेंढ्या ठार ; अपघातात चालकसह दोघं जखमी!
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील विवरे येथे मेंढ्यांनी भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १८ बीजी ४२१६) उटखेडा ते विवरे दरम्यान सबस्टेशनजवळ उलटला. या अपघातात ट्रकमधील १२५ पैकी २२ मेंढ्या ठार झाल्या. ही घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. अपघातात ट्रकचालक आणि क्लिनर हे जखमी झाले आहेत.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, ट्रक इंदूरहून मेंढ्या घेऊन हैदराबादकडे जात होता. विवरे ते उटखेडे दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. येथून वाहन चालवणे जिकरीचे झाले असून, अपघातस्थळी असलेला मोठा खड्डाच अपघातास कारणीभूत ठरला. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी होत आहे. या अपघातात चालक रईस खान (वय ४६), क्लिनर विजय (वय २७) आणि पवन (वय ३०) हे तिघे जखमी झाले आहेत. या अपघाताची कोणतीही नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आलेली नाही.