Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाभरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

भरधाव डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रस्तयाच्या परिस्थतीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने समोर चालणाऱ्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील धर्मेंद्र रामदयाल सोनी (वय ४२, रा. शिवराम नगर) हे गंभीर जखमी झाले. ही घटना दि. १८ रोजी काशिनाथ हॉटेलजवळ घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शिवराम नगरात धर्मेंद्र सोनी हे वास्तव्यास असून ते व्यापारी आहेत. दि. १८ रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास (एमएच १९, डीजी ८८८०) क्रमांकाच्या दुचाकीने सुरभी लॉन्स येथे फाईल देण्यासाठी पुतण्याला घेवून जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने जात असलेल्या (एमएच १५, एफव्ही ४९५४) क्रमांकाच्या डंपरने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात धर्मेंद सोनी हे गंभीर जखमी होवून त्यांच्या दुचाकीचे नुकसान झाले.

दरम्यान, धडक दिल्यानंतर डंपर चालक तेथून पसार झाला. उपचार घेतल्यानंतर सोनी यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिल्यावरुन डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या