Sunday, April 27, 2025
Homeगुन्हाभरधाव बसची कंटेनरला जबर धडक : ९ प्रवासी जखमी

भरधाव बसची कंटेनरला जबर धडक : ९ प्रवासी जखमी

भरधाव बसची कंटेनरला जबर धडक : ९ प्रवासी जखमी !

चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सुरतहून बऱ्हाणपूरकडे जाणाऱ्या बसने पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागून धडक दिल्याने नऊ जण जखमी झाले. यात लहान मुले, वृद्ध, महिला यांचा समावेश आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अडावद-यावल मार्गावर लोणी शिवारातील मोहन नाल्याजवळ शनिवारी दुपारी ४ वाजता ही घटना घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मध्यप्रदेश परिवहन मंडळाची मान्यता असलेली (एमपी- ६८, पी-२७०) या प्रवासी वाहतूक करणाऱ्या सुरत-ब-हाणपूर बसने अडावदनजीक लोणी शिवारातील मोहन नाल्याच्या पुलाजवळ दुचाकीस्वाराला वाचविताना पुढे चालणाऱ्या कंटेनरला मागून धडक दिली. यावेळी लोणी पोलिस पाटील नरेंद्र पाटील यांनी रुग्णवाहिका बोलवून ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना रुग्णवाहिकेत बसविले. जखमींवर धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आरोग्य सेविका भारती सोनवणे, भिकूबाई बोदडे, निशा वळवी, मोनाली पाटील, शिपाई विलास पवार, प्रशिक्षणार्थी निखिल सोनवणे यांनी प्रथमोपचार करून जिल्हा रुग्णालयात पाठवले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. घटनास्थळी अडावद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद बाघ, पोकॉ. सुनील तायडे, फिरोज तडवी, अनिल पिसाळ, शेषराव तोरे, शुभम बाविस्कर यांनी दोन्ही बाजूंनी खोळंबलेली वाहतूक सुरळीत केली. तसेच लक्ष्मण गुरव अडावद, धीरेंद्र पाटील, शैलेश पाटील, सौरव पाटील पंचक या तरुणांनी मदत केली.

नबाब रुबाब खाटिक (५०, यावल), गोकुळ प्रताप पाटील (३८, चोपडा), निर्मला एकनाथ चौधरी (४५), उज्ज्वला नीलेश पाटील (३८, दोन्ही रा. धानोरा), राजाराम भागा चव्हाण (६५), मंगला शंकर डोळे (५०, दोन्ही रा. धुळे), भावेश शरद भामरे (१२), आशा प्रदीप भामरे (३५, दोन्ही रा. मेहरगाव) आणि रामचंद्र बळीराम सोनवणे (५०, हिंगोणा) हे जखमी झाले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या