Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हाभरधाव वाळूच्या ट्रॅक्टरने सायकलस्वर बालकाला चिरडले !

भरधाव वाळूच्या ट्रॅक्टरने सायकलस्वर बालकाला चिरडले !

भरधाव वाळूच्या ट्रॅक्टरने सायकलस्वर बालकाला चिरडले !

पाचोरा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वाळूच्या भरधाव ट्रॅक्टरने सायकलवर जाणाऱ्या अथर्व उर्फ रुद्र जितेंद्र गोसावी (रा.राजीव गांधी कॉलनी, पाचोरा) या दहा वर्षीय बालकास चिरडले. यात बालक जागीच ठार झाला. ही भीषण घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास शहरातील शक्तीधामनजीक घडली.

ट्रॅक्टर चालकास अटक करण्यात आली आहे. अथर्व हा सा. प. शिंदे विद्यालयातील तिसरीचा विद्यार्थी होता. दुपारी चार वाजेच्या सुमारास घराजवळील शक्तीधाम कार्यालयाजवळ रस्त्यावर सायकलवर फिरत होता. याचवेळी अवैधरित्या गौण खनिज वाहणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला मागून धडक दिली. यात रुद्र हा मोठ्या चाकाखाली सापडून जागीच ठा झाला. घटना घडताच ट्रॅक्टरसह चालक तिथून पसार झाला. तिथ जमलेल्या नागरिकांनी पाठलाग करून ट्रॅक्टर पकडले व चालक विजय अशोक थोरात (३३, रा. पुनगाव, ता पाचोरा) यास पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यास अटक करण्यात आली आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या