Sunday, April 27, 2025
Homeजळगावभरधाव वाहनाने दुचाकीला चिरडले : भुसावळातील कामगार ठार !

भरधाव वाहनाने दुचाकीला चिरडले : भुसावळातील कामगार ठार !

भरधाव वाहनाने दुचाकीला चिरडले : भुसावळातील कामगार ठार !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळहून एमआयडीतील कंपनीत कामावर येत असलेल्या कामगाराला भरधाव अज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात महेंद्र एकनाथ बोंडे (वय ३८, रा. गणेशकॉलनी, भुसावळ) हे रस्त्यावर पडले. यावेळी त्यांच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शानिवार दि. १९ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास खेडीजवळील नाल्यावरील पुलावर घडली. हा अपघात इतका भीषण होता की, बोंडे यांच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता.

सविस्तर वृत्त असे कि, भुसावळातील गणेश कॉलनीत राहणारे महेंद्र बोंडे हे जळगावच्या एमआयडीसीतील गणेश अॅल्युमिनियम कंपनीत कामाला होते. दररोज ते दुचाकीने कामावर येत होते, नेहमीप्रमाणे शनिवार दि. २९ रोजी सकाळी महेंद्र बोंडे हे ( एमएच १९, बीडी ०६०२) क्रमांकाच्या दुचाकीने कामावर येण्यासाठी निघाले. जळगावपासून अवघ्या काही अंतरावर कामावर येत असलेल्या महेंद्र बोर्डे यांच्या दुचाकीला खेडी फाट्याजवळील अरुंद पुलावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले व त्यांच्या डोक्यावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर वाहन चालक हा वाहनासह पसार झाला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे कर्मचारी राहुल पाटील घटनास्थळी पोहचले. त्यांनी नागरिकांच्या मदतीने मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. अपघात झाल्याचे कळताच अपघातस्थळी बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. ज्याठिकाणी कामगार महेंद्र बोंडे यांना वाहनाने चिरडले. त्याठिकाणी नाल्यावर अरुंद पुल आहेत. तसेच काही अंतरावर शेती असल्याने नेमके घटनास्थळ परिसरात सीसीटीव्ही देखील नाहीत. त्यामुळे पोलिसांना या अपघाताचे फुटेज मिळणे अवघड झाले आहे. अज्ञात वाहनाने धडक दिली असली हे वाहन ट्रक असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या