भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाला तिघांनी केली जबर मारहाण ; गुन्हा दाखल!
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – एका कार्यक्रमात नाचत असताना मित्रासोबत एका जणाचे सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पवन सुधाकर बाविस्कर (२६, रा. आसोदा रोड) याला तीन जणांनी मारहाण करीत डोक्यात धारदार वस्तू मारली. यात तरुण जखमी झाला. ही घटना शुक्रवार दि.१७ ऑक्टोबर रोजी रात्री टॉवर चौकाजवळ घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टॉवर चौक परिसरात एका कार्यक्रमात पवन बाविस्कर याचा मित्र विशाल अरुण सपकाळे हा नाचत असताना गोविंदा नामक तरुणाचे त्याच्याशी भांडण झाले. हे भांडण सोडविण्यासाठी पवन गेला व त्याने भांडण सोडविल्याचा राग आल्याने गोविंदासह तीन जणांनी शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच त्याच्या डोक्यात धारदार वस्तू मारल्याने रक्तस्त्राव होऊन दुखापत झाली. या प्रकरणी पवन बाविस्कर याने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गोविंदा, हितेश, सोन्या (पूर्ण नाव माहीत नाही) या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पढील तपास पोलिस नाईक सधीर साळवे करीत आहेत.