भारताला बळकट करण्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा
तेजोदीप फाऊंडेशनच्या व्यवसाय, करीयर मार्गदर्शन सोहळ्यात आशिष नहार यांचे प्रतिपादन
नाशिक खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी : रोजगार मेळाव्यातून तरुणांना रोजगार मिळत असून होतकरू, गरजू उमेदवारांना त्याचा फायदा होत आहे. कंपन्यानाही चांगले उमेदवार मिळत आहेत. सशक्त भारत बनवण्यासाठी तरुण युवकांनी आपल्या नॉलेजचा उपयोग करून नवीन -नवीन संशोधने करावीत व भारताला मजबूत बनवण्यासाठी प्रयत्न करण्याचे मनोगत निमा अध्यक्ष आशिष नहार यांनी केले.
तेजोदीप नवविचार फाउंडेशन नाशिकने आयोजित केलेल्या भव्य रोजगार मेळावा व भव्य उद्योग व्यवसाय व करियर मार्गदर्शन उद्घाटनाच्या प्रसंगी भोळे मंगल कार्यालयात कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी प्रसंगी केले. आयमा अध्यक्ष ललित बुब निपम सचिव राजेंद्र
आचारी,निमाचे राजेंद्र वडनेरे, राजेंद्र अहिरे, गोविंद बोरसे, आयमाचे उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, बॉश कंपनी अधिकारी अनंत दांडेकर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश नेहेते यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी व मित्र परिवार सहयोगी सदस्यांनी केले होते. असे रोजगार मिळावे आयोजित करून नवयुवकांना संधी उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे निमाचे अध्यक्ष ललित बूब यांनी सांगतानाच फाउंडेशनचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या प्रस्ताविकातून राजेश नेहेते यांनी फाउंडेशन करत असलेल्या समाज उपयोगी कामाची माहिती सांगितली मेळाव्यामध्ये नाशिक, पुणे, मुंबई इतर भागातून ५५ कंपन्यांनी मेळाव्यात रोजगार उपलब्ध करून दिला तर ४०० हून अधिक युवकांनी कंपन्यांसाठी मुलाखती दिल्या तर नोकरी मिळविण्यासाठी ४९९ जणांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन केले तर फाऊंडेशनच्या whats app group वर एकूण ७०० पेक्षा जास्त उमेदवार नोकरीसाठी प्रविष्ठ झाले होते. तसेच अनेक उमेदवारांनी नोकरीसाठी जॉब सीव्ही फाऊंडेशनकडे पाठविले. दुसऱ्या दिवशीही (दि. १२ एप्रिल २५ ) फाउंडेशन तर्फे भव्य उद्योग व्यवसाय व करिअर मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. त्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष निमा माजी अध्यक्ष शशिकांत जाधव यांनी आपल्या अनुभवातून उद्योगांसाठी तरुणांनी अग्रेसर व्हावे छोट्या छोट्या वस्तूमध्ये ही शोधल्यास व्यवसाय उपलब्ध होतो व त्याच्यातून मोठे रूप धारण करतो नोकरी बरोबरच व्यवसायाचे मार्गदर्शन उत्तम रीतीने घेतल्यास संधी मिळते व त्याचे सोने करता येते.
व्यवसायातून रोजगार देणारे होता येत असल्याचे शशिकांत जाधव यांनी सांगितले. यावेळी मनोहर शिरोडे, स्टार्ट अप इंडिया मार्गदर्शकचे तुषार चौधरी, करिअर मार्गदर्शन अनंत वाघचौरे, महिला स्वयंरोजगारासाठी ज्योती लांडगे, मुलाखत पूर्वतयारीसाठी नेहा वाकचौरे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. दोन दिवसीय झालेल्या या कार्यक्रमात फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रात कार्य केलेल्या मान्यवरांचा स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ, प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यात उच्च शिक्षण – डॉ. किशोर पाटील, आध्यात्म- हभप रमाकांत भारंबे व प्रल्हाद ढाके, स्यवंरोजगार – गणेश येवले, शैलेश लोखंडे, शेतीपुरक व्यवसाय – दिलीप आनंदा झांबरे, सांस्कृतिक प्रशांत भारंबे, मंजुषा नितीन खर्चे, सामाजिक कार्य शिशिर दिनकर जावळे, महिला स्वंयरोजगार सविता संजय लोखंडे, उद्योग व्यवसाय सुशिल विनोद खंडेलवाल, प्रवीण बाळू राणे, लेखन साहित्य – कवयित्री श्रीमती सीमा जगन्नाथ भारंबे आदींचा तेजोरत्न २०२५ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
या नोकरी मेळाव्यात पुणे, नाशिक, जळगाव ,धुळे,नंदुरबार,यवतमाळ, इतर शहरातून नवयुवकांनी मुलाखतीसाठी गर्दी केली होती. तसेच अनेक जणांनी यावेळी रक्तदान केले.
नाशिक येथील लाईफ लाईन रक्तपेढी तथा रक्त केद्र यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. तसेच दोन दिवसीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप पाटील, वैशाली पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष राजेश नेहेते, उपाध्यक्ष योगेश कोलते, सचिव वसंत कोलते, सहसचिव किरण पाटील, खजिनदार संदीप राणे, निलेश बाक्षे, मुरलीधर खर्चे, मनोहर नाले, विनायक बेंडाळे, सुशिल नेहेते, सरिता नेहते, सरला धांडे, लीना लोखंडे, लता जंगले, रूपाली नारखेडे, अनंत वाकचौरे, दर्शन नेहते, चेतन फेगडे, हितेंद्र महाजन, रवींद्र भोळे, किशोर चौधरी, सुधाकर चौधरी, कुंदन डरंगे, हितेंद्र महाजन, प्रिया रडे, प्रिया येवले,तुषार भारंबे, दिनकर वायकोळे, आशुतोष झांबरे, मंदार चौधरी, तुषार भारंबे,पवन लोखंडे, रवी जाधव, नरेंद्र जंगले, गजानन किनगे, देवेंद्र कोलते, मनोज वराडे, मनिषा नाले, मनिषा किनगे, स्मिता आहेर, सुनीता कोलते, शैला पाटील, ज्योत्सना बेंडाळे, रमेश गर्गे, गणेश ठाकूर, आशुतोष झांबरे, गणेश येवले, संजय राणे, चेतन फेगडे यांच्यासह सर्व सहयोगी समाज बांधव व भगिणींनी परिश्रम घेतले.