भारत सरकार तर्फे परराष्ट्र मंत्रालयाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 या कालावधीत “स्वच्छता ही सेवा”
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – एसएचएस – 2024 मोहिमेचे आयोजन संपूर्ण भारतात प्रत्येक रेल्वे जोन मध्ये केले होते.या अंतर्गत मध्य रेल्वेत रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी २३ सप्टेंबर २४ रोजी भुसावल डिवीज़न मध्ये स्वच्छता ही सेवा अंतर्गत निबंध स्पर्धा आयोजीत केली होती.
या स्पर्धेत भुसावल डिवीज़न मधील विविध डिपार्टमेंट च्या पुरुष व महिला कर्मचार्यानी भाग घेतला होता या स्पर्धेत मैकेनिकल विभागातील शैलेश साहेबराव माळी यांनी तृतीय क्रमांक पटकावला असून त्यांचा भुसावल डिवीज़न च्या डी आर एम इति पांडे मैडम यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला आहे .या यशाबद्दल त्यांचे Sr.DME, Sr.DPO, APO आदी मान्यवरानी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.