Monday, March 17, 2025
Homeगुन्हाभावाचा अपघात केल्याच्या रागातून कुऱ्हाडीने वार

भावाचा अपघात केल्याच्या रागातून कुऱ्हाडीने वार

भावाचा अपघात केल्याच्या रागातून कुऱ्हाडीने वार

एरंडोल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील खर्ची येथे दि. २० ऑक्टोबर रविवारी, दुपारी २:३० वाजेच्या सुमारास खर्ची बस स्टॉपजवळ जयदीप भगतसिंग पाटील (रा. खर्ची, ता. एरंडोल) यांच्या उजव्या पायावर राम जयसिंग पाटील (रा. खर्ची, ता. एरंडोल) व इतर १५ ते २० लोकांनी कुन्हाड मारून दुखापत केली. भावाचा अपघात केल्याचा रागातून हा प्रकार घडला.
तसेच जयदीप पाटील यांच्यासोबत उपस्थित असलेल्या नितीन पाटील यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली याप्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे. कॉ. राजेश पाटील व सहकारी करीत आहेत.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या