भुसावळचे माजी आमदार संतोषभाऊ चौधरी भूमिका स्पष्ट करणार ?
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ विधानसभा निवडणुकीत प्रचारापासून अंतर ठेवून असलेले माजी आमदार संतोष चौधरी हे गुरुवार, 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात आपली भूमिका जाहीर करणार आहेत.राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल राधाकृष्ण येथे संतोष भाऊ चौधरी यांनी सकाळी 10 वाजता कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन केले आहे.याच दिवशी कोणत्या उमेदवारास सहकार्य करावे हे स्पष्ट होणार असून सर्वाचे लक्ष त्यांच्या भूमिके कडे लागले आहे .
संतोष चौधरी कार्यकर्त्यांनी विचारून भूमिका जाहीर करणार
माजी आमदार चौधरी हे गुरुवारी सकाळी 10 वाजता आयोजित मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे त्यानंतर ते आपली निवडणुकीत कोणाला सहकार्य करावे हे स्पष्ट करणार आहे.याबाबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह माजी नगरसेवकांनी मोठ्या संख्येने या मेळाव्यास उपस्थिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.भुसावळच्या उमेदवारास त्यांच्या भूमिकेने फायदा होणार हे निश्चित आहे. संतोष भाऊ सक्रीय झाल्यावर चित्र बदलणार असे बोलले जात आहे .