भुसावळमध्ये नवरात्रीसाठी गरबा ड्रेसची मागणी वाढली…
विक्रेत्यांकडून रंगीबेरंगी कपड्यांची विक्री सुरू
भुसावळ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – शहरात नवरात्र उत्सवा निमित्त दांडिया आणि गरबा रासची उत्सुकता वाढली आहे. प्रत्येक वर्षाप्रमाणे यंदा ही नवरात्रीचे दिवस उत्साहपूर्ण बनवण्यासाठी अनेक तरुण-तरुणी दांडिया आणि गरबामध्ये भाग घेणार आहेत. या उत्सवाचे वैशिष्ट्य. गरबा खेळताना परिधान केले जाणारे खास पारंपरिक रंगीबेरंगी कपडे, ज्याची मागणी नवरात्रीच्या आधीपासुनच वाढू लागली आहे.
शहरातील विक्रेत्यांनी यावर्षी नव्या ट्रेंडनुसार गरबा चे ड्रेस उपलब्ध करून दिले आहेत. विविध रंगांचे आणि आकर्षक डिझाईन्सचे ड्रेस विक्रीसाठी दुकानांमध्ये ठेवलेले आहेत. पारंपरिक घागरा-चोलीसोबतच आधुनिक ड्रेसचे ट्रेंडही वाढताना दिसत आहे. विक्रेत्यांनी गुजरात, राजस्थान येथून देखील खास पारंपरिक ड्रेस आणले आहेत, जे ग्राहकांना विशेष आकर्षित करीत आहेत. त्यात विविध रंगांचे लेहंगा चोली, बंधेज, मिरर वर्क, काठीयावाडी स्टाइल्सचा समावेश आहे. भुसावळ शहरातील प्रमुख वस्त्र दालनांमध्ये आणि बाजारपेठांमध्ये या गरबा ड्रेसची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. विक्रेत्यांच्या मते, मागणी वाढल्याने व्यवसायात चांगली वाढ दिसून येत आहे. त्याचबरोबर विविध प्रकारचे दांडिया काठी सेट, फॅशन अॅक्सेसरीज आणि दागिन्यांची विक्री देखील होत आहे. नवरात्रीच्या सणात गरबा आणि दांडिया खेळणारे पारंपरिक कपड्यांमध्ये उत्सवाची शोभा वाढवत या उत्साहात बाजारपेठेत व्यापाऱ्यांना देखील भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
ग्राहक आनंदी
गरबा ड्रेस खरेदीसाठी बाजारात आलेल्या ग्राहकांनी उत्साहपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काही ग्राहकांनी सांगितले की, नवरात्रीच्या सणासाठी खास पारंपरिक ड्रेस मिळत असल्यामुळे आम्हाला मोठा आनंद होत आहे. यंदा बाजारात विविध रंग आणि डिझाईन्स उपलब्ध आहेत, त्यामुळे खरेदीचा अनुभव खास आहे. तर काही तरुणींनी सांगितले की, फ्यूजन ड्रेसची डिझाईन्स खूप आकर्षक आहेत. पारंपरिक आणि आधुनिक ड्रेसचे मिश्रण असल्याने आम्ही दरवर्षर्षीपेक्षा काहीतरी वेगळे खरेदी करत आहोत
नवरात्री उत्सवा निमित्य गरबा खेळासाठी घागरा व इतर कपड्यांची मागणी वाढली आहे. ३००रू. पासून ते दोन हजारापर्यंत विक्रीसाठी ड्रेस आणि मटेरीयल विक्री करीता आणले आहेत. नवरात्र उत्सवासाठी विविध रंगातील घागरे, चोली,फॅन्सी धोती नक्षीकाम केलेले जॅफेट, आमच्याकडे विक्रीसाठी असुन मोठया प्रमाणात मागणी वाढली असुन गुजरात राजस्थान येथुन विक्री करीता मागवले आहेत खरेदीसाठी महिलांची मोठया प्रमाणात रेलचेल वाढली आहे .
सुनिल मुलचंदानी
रूपकला क्लाथ स्टोअर्सचे संचालक भुसावळ