भुसावळातील जामनेर रोडवरील देशी दारू दुकानाचे लायसन रद्दसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण झाले दाखल !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथील जामनेर रोड वरील देशी दारु दुकान ला.नं.CLIII, ११५/२०२२-२३ ही पुर्वी श्रीमतीउषाबाई सुरेश ब-हाटे व चंद्रकात गोपाल ब-हाटे यांच्या नावाने सुरु होती परंतु तदनंतर दोघांनी भुसावळ येथील दिपक पितांबर टेकवानी व खेमचंद वेन्सी टेकवानी यांचे सोबत मोठे आर्थीक व्यवहार करुन शासनास कोणतेही आर्थीक व्यव्हार न करता राज्य उत्पादन शुल्क तसेचव जिल्हाधिकारी जळगांव यांची दिशाभुल करुन सदरचे देशी दारुचे लायसन्स दिपक तसेच खेमचंद यांचे नावावर ट्रांसफर करुन घेतले.
याबाबत संपुर्ण पुराव्यासह सदरील दुकानाचे नोकरनामाधारक मयुर नारायण तिवारी यांनी दि. १० सप्टेंबर२०२४ रोजी जिल्हाधिकारी, जळगांव यांचेकडे बॉम्बे प्रोव्हीजन अॅक्टचे कलम ५४ [१] [ई] अन्वये सदरचे लायसन्स रदद करणेबाबत याचिका दाखल केलेली असुन सदरील याचिकेत सद्यस्थितीत परवानाधारक असलेले दिपक पितांबर टेकवानी, खेमचंद वेन्सी टेकवानी व पुर्वीचे परवानाधारक श्रीमती उषाबाई सुरेश ब-हाटे, चंद्रकांत गोपाल ब-हाटे तसेच पोलिस अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क जळगांव व पोलिस निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क,भुसावळ यांनापार्टी करण्यात आलेले असुन सदरचे प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयात पुढील सुनावणीकामी प्रलंबित असुन त्यातील पिटीशनर मयुर नारायण तिवारी यांचे तर्फे अॅड.कृष्णा आर.सिंग हया काम पाहत आहे. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले असून जिल्हाधिकारी काय निर्णय आदेश देतात याकडे संपूर्ण भुसावळ शहराचे लक्ष लागून आहे.याबाबत जळगाव येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक यांना दि.१० ऑक्टोबर २०२४ रोजी जिल्हाधिकारी जळगाव यांनी लेखी पत्र दिले आहे.