भुसावळातील टेन्ट हाउस गोडावूनला भीषण आग ; सुमारे ६० ते ६५ लाखांचा मुद्देमाल जळून खाक!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ येथील वांजोळा रोड परिसरात असलेल्या रेणुका माता मंदिर रस्त्यावर सायंकाळी पाच वाजता तुम्हाला अचानक आग लागली होती आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .
या आगीत राणे ब्रदर्स यांचे दिनेश टेन्ट हाऊस हे बघता बघता त्यांच्यात डोळा देखत जळून खाक झाले आहे यावेळी टेन्ट हाऊसचे मालक कुशल राणे यांचा आक्रोश मन हे लावून टाकणारा होता. घटनेचे वृत्त समजतात भुसावळ येथील अग्निशमन दल नगर परिषदेचे कर्मचारी ऑर्डनन्स फॅक्टरी व अन्य भागातून मोठ्या प्रमाणावर अग्निशमन वाहन घटनास्थळी दाखल झाले त्यांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला सुमारे अडीच ते तीन तास या कर्मचाऱ्यांनी व त्यांच्या सर्व सहकार्याने झुंज दिली होती मात्र आगीचे स्वरूप अतिशय रौद्र होते. सुमारे ६० ते ६५ लाख रुपयांचे टेंट सामान जळून खाक झाले आहे.
घटनास्थळी तहसीलदार निता लबडे व तलाठी पवन नवगाळे अन्य अधिकारी दाखल झाले आहे बाजारपेठ पोलीस कर्मचारी अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित झाले होते.आगीचा रुद्रावतार पाहता यावेळी परिसरातील घरे देखील रिकामी करण्यात आली होती. ज्या ठिकाणी आग लागली तेथून अवघ्या दहा-बारा फूट अंतरावर एक विवाह सोहळा होता व तो सोहळा नुकताच आटोपला होता नवरी ची बिदाई सुरू असताना ही घटना घडली आहे .या आगीत सुदैवाने जीवित हानी झालेली नसली तरी मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झालेली आहे.शहरातील दिनेश टेन्ट हाऊस चे मालक कुशल राणे व त्यांच्या मित्रांनी मोठ्या जिद्दीने हा व्यवसाय उभा केला होता. मध्यंतरी या मुलांनी फटाक्यांचा देखील व्यवसाय केला मात्र याआगीचा त्या फटाक्यांचा काहीही संबंध नाही.
यामुळे या टेन्ट हाऊसची वरील छत पूर्णपणे खाली पोहचले आहे.आगीचे वृत्त समजताच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे, पिंटू कोठारी, देवा वाणी, एडवोकेट बोधराज चौधरी, किरण मिस्त्री, निखिल परदेशी, जितु मखिजा, बबुलु बऱ्हाटे, रवि ढगे, गुड्डू बढे यांच्या सह अन्य सहकारी यांनी आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले होते