भुसावळातील वांजोळा रस्त्यावरील प्रेरणानगर फाट्याजवळ दोन गावठी पिस्तुलांसह दोघांना अटक !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील वांजोळा रस्त्यावरील प्रेरणानगर फाट्याजवळ बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोघांना दोन गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतूस ताब्यात घेतले. त्यांची किंमत सुमारे ५१ हजार आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी साडेचार करण्यात आली.ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नावे मुकेश मोहन अटवाल (२०) रा. वाल्मीक नगर, भुसावळ, यश किरण बोयत (२२, भुसावळ) अशी आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.