भुसावळातून स्कॉर्पिओ कार लांबवणाऱ्या चोरट्याला यवतमाळ येथे बेड्या !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील शहर पोलीस स्टेशनला हद्दीतील मेथाजी मळा येथुन अज्ञात चोरट्याने जुलाई २०२४ या वर्षाला महिंद्रा कंपनी ची स्कॉर्पिओ चारचाकी वाहन चोरून नेल्याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करून यवतमाळजिल्ह्यातील अवधुतवाडी तेथून ता.७ एप्रिल २०२५ रोजी संशयितास ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.प्रफ्फुल गजानन गांगेकर असे संशयित आरोपीचे नाव आहे.
याबाबत शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाल्या नंतर सदर प्रकरणात पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून सदरील गुन्हा हा आरोपी नामे प्रफ्फुल गजानन गांगेकर रा भोसा रोड, यवतमाळ याने केल्या बाबत माहिती प्राप्त होताच उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे यांचे मार्गदर्शनाखाली शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक उद्धव डमाळे यांचे आदेशाने एक पथक तयार करून जिल्हा यवतमाळ येथे आरोपीचे शोध घेणे कामी रवाना करण्यात आले होते.

सदर पथकातील पोलीस हवालदार उमाकांत पाटील, पोलीस शिपाई राहुल भोई यांनी यवतमाळ येथे अवधूतवाडी पोस्टे जिल्हा, यवतमाळ येथील गुन्हे शोध पथकातील अंमलदार यांची मदत घेवून सलग तीन दिवस सदर आरोपी याचा शोध घेवून त्यास ताब्यात घेतले आहे . आरोपी नामे प्रफ्फुल गजानन गांगेकर याने सदर वाहन चोरी केल्याबाबत कबुली दिल्याने त्यास भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे आणून गुन्ह्याचे तपासकामी अटक करण्यात आली आहे अटके दरम्यान त्याने सदरील वाहन हे नागपूर येथे त्याचे साथीदार सैफुद्दीन खान रा-नागपूर यास दिले बाबत माहिती दिल्याने त्यास नागपूर येथे जावून ताब्यात घेण्यात आलेले आहे व सदर गुन्ह्याचे तपास कामी अटक करण्यात आली आहे. पुढील गुन्ह्याचा तपास स. फौ. विनोद नेवे हे करीत आहे.
सदरची कारवाई डॉ. महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, जळगाव, अशोक नखाते, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णांत पिंगळे, पोलीस निरीक्षक उद्धव डमाले यांचे मार्गदर्शना खाली पोहेकॉ उमाकांत पाटील, संदीप पालवे, पोलीस शिपाई राहुल भोई यांनी केली.या कारवाई मुळे आणखी काही चोरीच्या गाड्या मिळण्याची शक्यता आहे .