Wednesday, March 26, 2025
Homeजळगावभुसावळात कपडे शिवण्याच्या कंपनीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग : ३५ लाखांचे नुकसान !

भुसावळात कपडे शिवण्याच्या कंपनीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग : ३५ लाखांचे नुकसान !

भुसावळात कपडे शिवण्याच्या कंपनीमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग : ३५ लाखांचे नुकसान !

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शहरातील चक्रधर नगरातील गायत्री मंदिराच्या मागील भागात संजय सुकलाल परदेशी यांच्या गिफ्ट फॅशन डिझायनिंग या कपडे शिवण्याच्या कंपनीमध्ये शॉर्टसर्किटमुळे गुरुवारी दुपारी साडेबारा वाजता आग लागल्याने तब्बल ३५ लाखांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली.

 

Oplus_131072

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, यावेळेस परदेशी हे तहसील कार्यालयात कामानिमित्त गेले होते तर त्यांची पत्नी रंजना परदेशी हे बाजारात गेल्या होत्या. तेव्हा या कंपनीत त्यांचे १५ लाख रुपयांचे इंडस्ट्रियल गारमेंट मशीन, पाच लाखांचे रॉ मटेरियल, कॉम्प्युटर, लॅपटॉप, फर्निचर टीव्ही, केबिन वायरिंग, कुलर आदी साहित्य जळून खाक झाले. शेजाऱ्यांना धुराचे व आगीचे लोट उठताना दिसल्यावर त्यांनी त्वरित ही माहिती परदेशी यांना कळविली. आग आटोक्यात आणण्यासाठी

 

 

नगरपालिकेचे तीन अगनिबंब पाचारण करण्यात आले होते. दोन तासात आग आटोक्यात आली. माजी नगरसेवक पिंटू कोठारी, बोधराज चौधरी, नितीन धांडे, पुरुषोत्तम नारखेडे, रवी ढगे, महेंद्र चौधरी यांनी मदतकार्य केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या