भुसावळात कपड्याच्या दुकानाला भीषण आग
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी परिसरातील कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागल्याने सुमारे २५ लाख २० हजारांचे नुकसान झाल्याची घटना २५ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, या प्रकरणी दुपारी २ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली. राकेश महेशलाल कुकरेजा (वय ३०) यांचे सिंधी कॉलनीत श्री आनंद ड्रेस मटेरियल नावाचे कापड दुकान आहे. रात्रीच्या सुमारास अचानक त्यांच्या या दुकानाला भीषण आग लागली. या आगीत सुमारे २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जळून खाक झाला