भुसावळात खून का बदला खून : भर चौकात पहाटे गोळीबार करून युवकाची हत्या!
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी –
फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या तरुणाच्या हत्येचा बदला म्हणून संशयीत आरोपीचा गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना भुसावळ शहरात घडली आहे.

ही धक्कादायक घटना शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता भुसावळातील खडका रोडवरील अमरदीप टॉकीज जवळील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात घडली.
तेहरीन नासीर शेख वय 27, मच्छीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
जाम मोहल्ला भागातील आर. के. किताब घरासमोरील डीडी सुपर कोल्ड्रिंक्स आणि चहाच्या दुकानात तेहरीन नासीर शेख (27, मच्छीवाडा, जाम मोहल्ला, भुसावळ) हा चहा पिण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता आल्यानंतर दोन दुचाकीवर तोंडाला रूमाल बांधून आलेल्या चार संशयीतांपैकी तिघांनी आपल्याकडील गावठी पिस्टलातून पाच गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती सुत्राकडून मिळाली आहे.
या घटनेनं दुकानातील ग्राहकांमध्ये धावपळ झाली होती तर काही क्षणात संशयीत दुचाकीवरून पसार झाले.
गोळीबारात शरीरातील विविध भागात गोळ्या लागल्याने तेहरीनचा जागीच मृत्यू झाला
तर पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक राहुल वाघ आणि सहकाऱ्यांनी धाव घेतली होती .
चार संशयीतांचा परिसरातील सी सी टिव्ही कॅमेऱ्याच्या आधारे कसून शोध सुरू आहे.
फेब्रुवारी 2023 मध्ये झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी हा खून करण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. दरम्यान या घटनेनं भुसावळात नागरिकांमध्ये भीतीयुक्त वातावरण पसरलं आहे..